रूप रंग जरी असेल वेगळे
भौतिकतेचे विज्ञान सगळे ।
विज्ञानाचीच सारी किमया
झाली वेडी सारी दुनिया ।
वर्चस्वाची सुरू लढाई
कमजोरावर करतो चढाई ।
जीवनाचाच नाही विचार
माणूस झाला इथे लाचार ।
स्वार्थासाठी रक्त सांडते ।
माणुसकीच इथे भांडते ।
Sanjay R.
रूप रंग जरी असेल वेगळे
भौतिकतेचे विज्ञान सगळे ।
विज्ञानाचीच सारी किमया
झाली वेडी सारी दुनिया ।
वर्चस्वाची सुरू लढाई
कमजोरावर करतो चढाई ।
जीवनाचाच नाही विचार
माणूस झाला इथे लाचार ।
स्वार्थासाठी रक्त सांडते ।
माणुसकीच इथे भांडते ।
Sanjay R.
आहे भाव मनात
कर करुणा देवा ।
चरणी मगतो तुझ्या
नको मिठाई मेवा ।
सदा हवी मजला
भाव भक्तीची सेवा ।
अंतरात दया माया
नको कुणाचा हेवा ।
आयुष्य हे रे माझे
आहे तुझाच ठेवा ।
भक्तीत व्हायचे लीन
कर कृपा तू देवा ।
Sanjay R.
शोधू मी कुठे तुला
तूच तर माझी आस ।
नजरही असते शोधत
नजरेलाच होतात भास ।
गंध तुझा दरवळतो
धुंद होतात श्वास ।
मनही मग घेते धाव
त्यालाही तुझाच ध्यास ।
तू मात्र सदा बेखबर
कळेना तुज माझे प्रयास ।
बघ जरा वळून मागे
अजूनही माझा तिथेच वास ।
Sanjay R
सावित्री ने घेतला वसा
शिक्षणाची दिली दिशा ।
शिकून सवरून मोठे व्हायचे
स्त्रिया झाल्या वेड्या पिशा ।
पुरुष पडलेत मागे आता
मिटली त्यांची सारी नशा ।
घराघरात सावित्री आली
पलटली सारी घराची दशा ।
जिंकतील जग ऐक दिवस
स्त्रियांवरच साऱ्या आशा ।
Sanjay R.
घेऊ किती मी शपथा
नव वर्षाच्या आणा भाका ।
कुठे होते काही पूर्ण
ध्येय आता ठरवूच नका ।
वाटेल तसे जगायचे
आपोआप टाळतो धोका ।
येइल परत नव वर्ष
बघू तेव्हा, मिळेलच मोका ।
ध्येय नको, नको आशा
हास्याचा रंग पडेल फिका ।
आज जगतो उद्याही जगेल
फक्त आनंदात जगायचे शिका ।
Sanjay R.