Wednesday, January 4, 2023

सावित्री चा वसा

सावित्री ने घेतला वसा
शिक्षणाची दिली दिशा ।

शिकून सवरून मोठे व्हायचे
स्त्रिया झाल्या वेड्या पिशा ।

पुरुष पडलेत मागे आता
मिटली त्यांची सारी नशा ।

घराघरात सावित्री आली
पलटली सारी घराची दशा ।

जिंकतील जग ऐक दिवस
स्त्रियांवरच साऱ्या आशा ।
Sanjay R.


नको ध्येय नको आशा

घेऊ किती मी शपथा
नव वर्षाच्या आणा भाका ।
कुठे होते काही पूर्ण
ध्येय आता ठरवूच नका ।

वाटेल तसे जगायचे
आपोआप टाळतो धोका ।
येइल परत नव वर्ष
बघू तेव्हा, मिळेलच मोका ।

ध्येय नको, नको आशा
हास्याचा रंग पडेल फिका ।
आज जगतो उद्याही जगेल
फक्त आनंदात जगायचे शिका ।
Sanjay R.


नव वर्षाचे ध्येय

नवीन वर्षाच्या पहिल्या रात्री
मनात असते एकच ध्येय ।
सुरुवात व्हावी जबरदस्त
आणि घ्यावे ऐक प्याला पेय ।

संसार कितिकांचे झालेत राख
कुठे चिंता होण्याची खाक ।
चार चौघात मिरवायचे असते
फक्त तिथेच राखायची साक ।
Sanjay R.


Tuesday, January 3, 2023

कविता प्रकाशित

माझे व्यासपीठ - जानेवारी 2023 अंकात माझी कविता, "फ्री चा आला जमाना " प्रकाशित झाली. संपादकांचे आभार 🙏

Monday, January 2, 2023

शोधतो आधार

हवा कुणास आधार
डोक्यावर होतो भार ।
पदोपदी मी झेलतो
मनात सारे प्रहार ।

असह्यच होते सारे
देतात घाव ते वार ।
थांबतात कुठे डोळे
आपोआप लागे धार ।

मुक्त व्हायचे मजला
नको वाटती विचार ।
भूत झालेत ते जुने
नवा शोधतो मी सार ।
Sanjay R.