Monday, January 2, 2023

नाही सुखाची आशा

नाही सुखाची आशा
नको दुःखाची निराशा ।
मन होते अधीर
होते कशी ही दशा ।
Sanjay R.


Sunday, January 1, 2023

नवीन वर्ष नवीन आशा

नवीन वर्ष
नवीन आशा ।
स्वप्न ऐक
दहा दिशा ।
स्वप्न पूर्तीची
एकच नशा ।
व्यक्त होण्या
एकच भाषा ।
प्रेमा विना
नाही त्रिषा ।
Sanjay R.


Saturday, December 31, 2022

नव वर्षाच्या शुभेच्छा

सरू देना हेही वर्ष
मीही हरणार नाही ।
राहिलेले सारेच मी
असे सोडणार नाही ।
नव वर्ष हे सुखाचे
समृद्ध होणार आहे ।
आशा आकांक्षा साऱ्या
पूर्ण करणार आहे ।

" Happy New Year "
             2023


इच्छा

मनात किती इच्छा
बंद त्या खिडकीआड ।
होईना पूर्ण काहीच
वाटे तो मोठ्ठा पहाड ।
Sanjay R.


सरले वर्ष हे आता

सरले वर्ष हे आता
नववर्षाचे आगमन ।
आठवतात मज
जुने सारेच क्षण ।

युद्धाची होती काळजी
भयभीत होते मन ।
युक्रेन झाले खंडार
मिसाईल गाजवी रण ।

वर्चस्वाची ही लढाई
प्रत्यकाचा वेगळा प्रण ।
जिवितांची काळजी कुणा
आयुष्यभर पोसू व्रण ।

नव वर्षाचा नवा डाव
भरेल धुराने का गगन ।
माणुसकीच नाही कुठे
कोण सांगा कसा जगन ।
Sanjay R.