मनात किती इच्छा
बंद त्या खिडकीआड ।
होईना पूर्ण काहीच
वाटे तो मोठ्ठा पहाड ।
Sanjay R.
Saturday, December 31, 2022
सरले वर्ष हे आता
सरले वर्ष हे आता
नववर्षाचे आगमन ।
आठवतात मज
जुने सारेच क्षण ।
युद्धाची होती काळजी
भयभीत होते मन ।
युक्रेन झाले खंडार
मिसाईल गाजवी रण ।
वर्चस्वाची ही लढाई
प्रत्यकाचा वेगळा प्रण ।
जिवितांची काळजी कुणा
आयुष्यभर पोसू व्रण ।
नव वर्षाचा नवा डाव
भरेल धुराने का गगन ।
माणुसकीच नाही कुठे
कोण सांगा कसा जगन ।
Sanjay R.
मंजुलिका
अनामिका नव्हे ती
होती मंजुलिका
भूत बनून आली जेव्हा
झाली अंजुलिका
डोक्यावर बांधली शेंडी
कपाळावर टीका ।
प्रेमापायी तिच्या कसा
पागल झाला मूका ।
भुताटकीच्या कथा बघा
वाटतो किती धोका ।
मनाचाच खेळ सारा
असतात साऱ्या फोका ।
Sanjay R.
Thursday, December 29, 2022
उघडुन डोळे नीट बघा
उघडुन डोळे नीट बघा
कोण इथे तुमचा सखा ।
जात फसवी माणसांची
कधीही देतील तेच धोका ।
दूर जरासे ठेवा काढून
धोकेबाजांना आधी रोका ।
देऊ नका हो एकही त्यांना
फसवेगिरीचा असा मोका ।
शब्दांमध्ये ही किंमत असते
वेळीच त्यांना जरा टोका ।
जमत नसेल तर बघा जरा
कीड लागलेले उपटून फेका ।
Sanjay R.
Wednesday, December 28, 2022
नको वळून पाहू
मागे वळून नको पाहू
आहे तो तर भूतकाळ
वर्तमान आहे जगायचा
भविष्य उद्याची सकाळ
काल गेला आज आला
आहे उद्या तर येणारच ।
नाही कुणास काळजी
जे व्हायचे ते होणारच ।
Sanjay R.