Wednesday, December 28, 2022

नको वळून पाहू

मागे वळून नको पाहू
आहे तो तर भूतकाळ
वर्तमान आहे जगायचा
भविष्य उद्याची सकाळ

काल गेला आज आला
आहे उद्या तर येणारच ।
नाही कुणास काळजी
जे व्हायचे ते होणारच ।
Sanjay R.


नव वर्षाची चाहूल

नव वर्षाची ही चाहूल
सरणार जुने नवे येणार ।
गत वर्षीच्या आठवणी
भविष्याला देई आधार ।
आनंद उत्सव करू साजरा
करू भूतकाळाला सार ।
नवावर्षाच्या नव्या आशा
स्वप्न मनातले करू साकार ।
Sanjay R.


छोटीसी परी

छोटी सी परी
दिसते ती बरी
हसते सदा पण
रडते कधी तरी
Sanjay R.


परी

छोटीशी ऐक परी
सुंदर ती किती
नव्हती तिला कुणाची
काहीच हो भीती ।

भ्रमण करायची स्वर्गात
यायची पृथ्वीवर कधी ।
वाटेवर तिच्या मधेच
पडायची अमृताची नदी ।

पाणी पिताच कोणी
अमर तो व्हायचा ।
सरळ मग परी संगे
स्वर्गातच  जायचा ।

दुष्ट जेव्हा प्यायचे पाणी
नरकात पोचायचा ।
हाल अपेष्टा शिक्षा
आयुष्यभर भोगायचा ।

होऊ नका हो दुष्ट
परी होईल रुष्ट ।
स्वर्गात जाण्यासाठी
तुम्ही करू थोडे कष्ट ।
Sanjay R.


झिम्मा फुगडी

आनंदाचा उत्सव आला
हसू खेळू या चला चला ।
झिम्मा फुगडी खेळू चला
माळून गजरा मिरवू चला ।
नवी कोरी ही साडी हिरवी
पदरावरती ही नक्षी माला ।
नटून थटून आल्या सखी
चला घेऊ या उंच झुला ।
Sanjay R.