Friday, December 23, 2022

नकळत मनात तू

नकळत मनात तू
घर करून गेली ।
विसरलो मलाच मी
तहान भूकही नेली ।

कधी कुठे पहिले तुला
नजरा नजर झाली ।
निघेना मनातून आता
मनाची तू राणी झाली ।

शोधतो तुलाच आता
रस्ता असला जरी खाली ।
विचार सदा असतो तुझा
नेत्रांची झोपही उडाली ।

परत येकदा वाटते बघावी
गालावरची तुझ्या लाली ।
चाहूल तुझी मी घेतो आणि
होतात श्वासही वर खाली ।
Sanjay R.


रंग मेंदीचा असा

रंग मेंदीचा असा
झाला गर्द कसा ।
प्रेमाचे ते प्रतिक
आहे घेतला वसा ।

रंग निघणार नाही
पक्का तो जसा ।
विश्वास हा माझा
आहे प्रेमात तसा ।

आनंद आहे प्रेमात
जरा थोडे तर हसा ।
नको काळजी आता
सुंदर तुम्हीही दिसा ।
Sanjay R.


रंग मेंदीचा

गर्द हा रंग मेंदीचा
हातावर खुलला ।
ओठावरच्या हास्याने
चेहराही फुलला ।

डोळे झाले बोलके
आनंदही झुलला ।
रंग गुलाबी कसा
सर्वस्वच भुलला ।
Sanjay R.


इतिहास जमा

काल जे होते
झाले इतिहास जमा ।
उद्या जे येईल
त्याची नाही तमा ।

दुखणे असते तेच
सांगू मी काय तुम्हा ।
रोज एक नवा दिवस
विचारतो कोण आम्हा ।
Sanjay R.


भावना

कुठे असते भावना
तिला भेटायचं मला ।
सरली म्हणतात सारे
दिसली का तुला ।

नको जाऊस आहारी
असते ती भारी ।
तुटली येकदा की
लागते जिव्हारी ।

स्वरात तिच्या हो
का ते कळत नाही ।
नकार देऊनही
होकार टाळत नाही ।
Sanjay R.