Wednesday, December 28, 2022

परी

छोटीशी ऐक परी
सुंदर ती किती
नव्हती तिला कुणाची
काहीच हो भीती ।

भ्रमण करायची स्वर्गात
यायची पृथ्वीवर कधी ।
वाटेवर तिच्या मधेच
पडायची अमृताची नदी ।

पाणी पिताच कोणी
अमर तो व्हायचा ।
सरळ मग परी संगे
स्वर्गातच  जायचा ।

दुष्ट जेव्हा प्यायचे पाणी
नरकात पोचायचा ।
हाल अपेष्टा शिक्षा
आयुष्यभर भोगायचा ।

होऊ नका हो दुष्ट
परी होईल रुष्ट ।
स्वर्गात जाण्यासाठी
तुम्ही करू थोडे कष्ट ।
Sanjay R.


झिम्मा फुगडी

आनंदाचा उत्सव आला
हसू खेळू या चला चला ।
झिम्मा फुगडी खेळू चला
माळून गजरा मिरवू चला ।
नवी कोरी ही साडी हिरवी
पदरावरती ही नक्षी माला ।
नटून थटून आल्या सखी
चला घेऊ या उंच झुला ।
Sanjay R.


झिम्मा

खेळू चला आज झिम्मा
नका करू तुम्ही हम्मा ।

जुने सारे खेळ झाले पार
घेतला मोबाईलचा आधार ।

मोबाईल मधेच बघतात सारे
पागल व्हाल हो नाही ते बरे ।

नजर तुमची होईल कमी
पाठीच्या आजाराची आहे हमी ।

जरा सोडा ना आता मोबाईल
झिम्मा खेळण्यात वेळही जाईल ।
Sanjay R.


शौर्य गाथा

नेताजी सुखदेव भगतसिंग
या अनेक वीरांच्या गाथा ।
दिले त्यांनी बलिदान आपले
नाही ती हो साधी कथा ।

हिंदवी स्वराज्य ज्यांनी स्थापले
ते शिवराय मुघलांशी लढले ।
शूर वीर ती झाशीची राणी
गांधी नेहरू ही इथेच घडले  ।

इतिहास जाणतो शौर्य तयांचे
त्या साऱ्यांना नमन आमचे ।
व्यर्थ नाही जाणार बलिदान
रक्षण करू या भारत भू चे ।
Sanjay R.


उत्सव

सरले उत्सव सारे
जगतो वास्तव इथे ।
अंतिम यात्राच बाकी
कळेना जायचे कुठे ।

दूर नीरव शांतता
गर्दीत मी उभा इथे ।
मार्ग सोपा की कठीण
कळेना जायचे कुठे ।

सत्य म्हणू की भ्रम तो
नाही कोणीच का तिथे ।
आत्मा अशांत वाटतो
कळेना जायचे कुठे ।

सोडून जीव मी आलो
भ्रमण नाही सरले ।
मृत्यू पुढे नी मी मागे
कळेना जायचे कुठे  ।
Sanjay R.