Friday, December 23, 2022

नको मज इतिहास

जगतो मी वर्तमान
नको मज इतिहास ।
भविष्याची नाही चिंता
आज घेतो तोच श्वास ।

जगण्यासाठी चाले सारे
निष्फळ होतात प्रयास ।
जगण्यापुढे नाही काही
पोटासाठी सारे ध्यास ।

बघतो रात्री स्वप्न एकच
होतो सुखाचा आभास ।
दिवस ऐक येईल बरा
आहे मनात विश्वास ।
Sanjay R.


थंड वारा

गार झाला वारा
उतरला पारा ।
वाटते किती थंडी
जणू बर्फाचा मारा ।
सोसेना आता मज
हले अंग थरथरा ।
दवबिंदू पाना वरती
देई काय इशारा ।
वाटे हवा गरम चहा
तोच थंडीचा चारा ।
पेटवा कोणी शेकोटी
देईल तीच सहारा ।
हवे रजई ब्लँकेट
नाही तो पसारा ।
Sanjay R.


हवा एकांत

मनाला कोण जाणतं
पण खूप काही सांगतं ।

कधी इथे कधी तिथे
ऐका जागी कुठे थांबतं ।

नाही लागत थांग पत्ता
मनात वेगळच चालतं ।

वारा नसतानाही कसं
झाड आपोआप हालतं ।

भावनाच त्या मनाच्या
हवा त्याला ही एकांत ।
Sanjay R.


नको देऊस याद

नको देऊस तू याद
नाहीच कळणार तुला
माझ्या मनाची साद ।
वाटल असेल ना तुला
का करतो मी वाद ।
नव्हताच तो वाद
होता माझ्या मनाचा
फक्त मनाशी संवाद ।
मलाही हवी होती
त्यावर तुझी दाद ।
Sanjay R.


अनाकलनीय

सगळेच इथे अनाकलनीय
फक्त ते बघायचे ।
विचार नकोत फार
बघून दूर सारायचे ।
आपल्यात आपण खुश
दुसऱ्यांचे काय करायचे ।
दिवस आहेत अजून
तोवर तर जगायचे ।
हसा खेळा मस्ती करा
येवढेच मज सांगायचे ।
Sanjay R.