Thursday, December 22, 2022

अहिंसेचे पुजारी

आम्ही अहिंसेचे पुजारी
नको हिंसेची बात ।
गोड गोड बोलून रे
करतात जवळचेच घात ।
मज वाटते आता
नको कुणाचा हात ।
आसही नको आता
नको कुणाची साथ ।
Sanjay R.


जीवनाचे चक्र

जीवनाचे हे चल चक्र
चालेले निरंतर ।
भूतकाळ जातो निघून
वर्तमानात प्रत्यंतर ।

भविष्याचे सारे अंदाज
पडते थोडे अंतर ।
जीवन कुठे हो थांबते
अपेक्षाच अवांतर ।
Sanjay R.


भविष्य

होतो इथे तर दिवस
आजचाच कठीण ।
भविष्याचा करता विचार
डोकं होते भिन ।

कष्टाला नाही किंमत
उधरीचा दिसे आव ।
माणुसकी तर सरली
विचारही बेभाव ।

दुःख इथे भोगायचे
नाही कुणाचा आधार ।
मेल्यावरही सुटणार नाही
डोक्यावरचा भार ।
Sanjay R.


कशी तुझी यारी

कशी तुझी यारी
कर ना तयारी ।
ऐक ऐक दिवस
जातो किती भारी ।
बघत असतो सारखा
साऱ्या दिशा चारी ।
मनही माझे घेते
वारंवार भरारी ।
सोड तुझा हट्ट
बसलोय मी दारी ।
Sanjay R.


चार यार

असेल ज्यासी चार यार
बघा त्याला किती आधार ।
मित्र तर मित्र्च असतात
उचलतात तुमचाही भार ।
भांडण हो वा होऊ दे तंटा
खावा लागत नाही मार ।
अडचणींचा असू दे डोंगर
नौका लावतात तेच पार ।
खाणे असो वा असो पिणे
सगळ्यांचे सारखे विचार ।
मौज मजा सुख दुःखात
यारच तर होतात भागीदार ।
Sanjay R.