Friday, December 9, 2022

रात्र मंतरलेली

डोईवर भार प्रकाशाचा
काया दिवसा हरलेली ।
थकुन भागून निजते जशी
असते रात्र मंतरलेली ।

नजरा जणू वखवखलेल्या
काया होई काळवंडलेली ।
काळोखात निखरते रूप
रात्र होते सळसळलेली ।

अंतरात वसे विष दंशाचे
आशा मनात विझलेली ।
रात्री होऊन ती चांदणी
विसावते राणी हरलेली ।
Sanjay R.


स्त्री

संगिनी तू
तूच अर्धांगिनी ।
तुज विन काय
माझ्या जीवनी ।
आदर आहे तुझा
सांगतो माझ्या मनी ।
कसे मानू आभार
आहे मी ऋणी ।
Sanjay R.


Thursday, December 8, 2022

माऊली

मिळाली साथ जीवनाची
अर्धांगिनी तू आयुष्याची ।
सुख दुःखात देतेस साथ
चिंता साऱ्या परिवाराची ।
सकाळपासून किती राबते
फुरसत नसते क्षणाची ।
तरी असतो हसरा चेहरा
खबर तुजला प्रत्येकाची ।
हवे नको ते सारेच बघते
काळजी नसते स्वतःची ।
आई पत्नी सूनही होतेस
जाण तुलाच नात्यांची ।
तुझ्या विना विचारच नको
माऊली तूच ग सगळ्यांची ।
Sanjay R.


संसाराची दोन चाके

संसाराची दोन चाके
आयुष्याचा रथ हाके ।
होतो पुरुष पुढे आणि
अर्धांगिनी त्याच्या मागे ।
जीवनाला मिळे गती
भार उचलून चाले दोघे ।
थांबण्यास वेळ नाही
कष्टातून नशीब जागे ।
Sanjay R.


जीव गुंतला तुझ्यात

जीव गुंतला तुझ्यात
असतेस तू मनात
तुलाच असतो बघत
येतेस ना तू स्वप्नात
Sanjay R.