Thursday, December 8, 2022

आरोप

करू नकोस आरोप
अन्यथा घे हाच निरोप ।
झाले गेले विसर आता
चल करू समारोप ।
Sanjay R.


Wednesday, December 7, 2022

तू

हटत नाही नजर
असतेस पुढेच तू ।
वळून बघतो मागे
तिथेही असतेस तू ।

स्वप्नात होतात भास
शोधतो तिथेही तू ।
होऊन जागा बघतो
परत पुढ्यात तू ।

निराश होते मन
आशेचा किरण तू ।
आनंदाचा ऐक क्षण
हसत असतेस तू ।

नको वाटते जगणे
त्याही विचारात तू ।
जगण्याची तऱ्हा वेगळी
त्यात मज हवी तू ।
Sanjay R.


डाव

जीवन खेळाचा डाव
सदा चाले धावा धाव
नकोच कशाची हाव
आपोआप होते नाव
Sanjay R.


विचार

मनात विचारांचे भांडार
काढायचा त्यातून सार ।
अवतरतात चार ओळी
शब्दांना करुनिया स्वार ।
Sanjay R.

सर्वच इथे स्टार

सगळेच इथे स्टार
करतात छुपे वार ।
अचानक होती गायब
मग शोधतात आधार ।
नको तेच घडते
वाटतो भूमीला भार ।
घोंगावतात मग
डोक्यात भारी विचार ।
सुचेना काहीच
मन होते लाचार ।
चांगले ते घ्यायचे
वाचायचे सुविचार ।
बदला मग थोडे
बदलतील आचार ।
कशाला हवा
कशाचा प्रचार ।
जीवनाची ही नौका
होईल हो पार ।
Sanjay R.