इंद्रधनुचे तर रंग सात
पुरतात कुठे तिथे हात ।
रंगांची होते उधळण
आकाशाची अलगच बात ।
उदय असो वा होई अस्त
लाल रंगांची सूर्यास साथ ।
निळे निळे ते दूर आकाश
क्षितिजालाही मिळते मात ।
Sanjay R.
Thursday, December 8, 2022
इंद्रधनु
नऊ रंग
नऊ रंगांनी बहरली
ही दुनिया सारी ।
हिरवी झाडे लाल फुले
उधळण रंगाची भारी ।
दिवसाला घाई गडबड
दिसे सारा पसारा ।
रात्र असते शांत किती
साद देतो हळूच वारा ।
नक्षत्रांचे अलगच रूप
कधी वाटे किती गारवा ।
मधेच निघते तापून धरा
पाऊस पडता रंग हिरवा ।
Sanjay R.
रंग प्रेमाचे
मन आज ना माने
झाले काय कोण जाणे ।
आठवे मज ऐक गाणे
त्याचे ऐकावे तराणे ।
बघावे वाटते तुला
मन झाले अधीर ।
फुलपाखरू ते झाले
त्यासी कुठे धीर ।
घेऊन तुज उडावे
जावे कुठे दूर ।
गावे गीत प्रेमाचे
मिळवून सुरात सुर ।
रंग किती या प्रेमाचे
इंद्रधनुचा होतो भास ।
फुलतो गुलाब गाली
नी बेधुंद होतो श्वास ।
Sanjay R.
भंग
कधी स्वप्नांचा होतो
चुराडा इथे ।
अभंग प्रेमाचा होतो
का भंग तिथे ।
मार्ग प्रेमाचा हा
नाही हो बरा ।
बघा वळून थोडे
थांबून जरा ।
वाहते झुळझुळ पाणी
तरी ते संथ ।
कळणार नाही तुम्हा
होईल जेव्हा अंत ।
डोळ्यात नाही मावणार
आसवांचा तो ढग ।
गालावरून ओघळतील
संतत धारा मग ।
Sanjay R.
बाळ रडते जेव्हा
रडतो बाळ जेव्हा
निरागस त्याचे भाव ।
डोळ्यात नसतात अश्रू
कळेना मनाचा ठाव ।
कधी हसतो गालात
त्याची असते कुठे धाव ।
हलवतो पाय जोरात
जसा वल्हवितो नाव ।
Sanjay R.