Thursday, December 8, 2022

भंग

कधी स्वप्नांचा होतो
चुराडा इथे ।
अभंग प्रेमाचा होतो
का भंग तिथे ।

मार्ग प्रेमाचा हा
नाही हो बरा ।
बघा वळून थोडे
थांबून जरा ।

वाहते झुळझुळ पाणी
तरी ते संथ ।
कळणार नाही तुम्हा
होईल जेव्हा अंत ।

डोळ्यात नाही मावणार
आसवांचा तो ढग ।
गालावरून ओघळतील
संतत धारा मग ।
Sanjay R.


बाळ रडते जेव्हा

रडतो बाळ जेव्हा
निरागस त्याचे भाव ।
डोळ्यात नसतात अश्रू
कळेना मनाचा ठाव ।
कधी हसतो गालात
त्याची असते कुठे धाव ।
हलवतो पाय जोरात
जसा वल्हवितो नाव ।
Sanjay R.


सुंदर मळा

तुझ्या माझ्या प्रेमाचा
फुलू दे सुंदर मळा ।
चल जाऊ या दूर कुठे
मलाही लागू दे लळा ।
Sanjay R.


आरोप

करू नकोस आरोप
अन्यथा घे हाच निरोप ।
झाले गेले विसर आता
चल करू समारोप ।
Sanjay R.


Wednesday, December 7, 2022

तू

हटत नाही नजर
असतेस पुढेच तू ।
वळून बघतो मागे
तिथेही असतेस तू ।

स्वप्नात होतात भास
शोधतो तिथेही तू ।
होऊन जागा बघतो
परत पुढ्यात तू ।

निराश होते मन
आशेचा किरण तू ।
आनंदाचा ऐक क्षण
हसत असतेस तू ।

नको वाटते जगणे
त्याही विचारात तू ।
जगण्याची तऱ्हा वेगळी
त्यात मज हवी तू ।
Sanjay R.