Wednesday, December 7, 2022

नजर ही ढळेना

डोळ्यात तुझिया जादू
नजर ही ढळेना ।
होऊन स्तब्ध मी जातो
माझे मलाच कळेना ।

डोकावून जातो विचार
रास तुझ्याशी जुळेना ।
आठवणीत असे सदा
का वेळ ती टळेना ।

भावनांचा येतो पूर
मन मात्र वाळेना ।
राख झालीत स्वप्ने
आठवण ही जळेना ।
Sanjay R.


लावू नको नजर

नजरेला तू लावू नको नजर
मनही माझे रे आहे इथे हजर ।

वाढली कशी श्र्वासांची गती
धडधडते हृदय नी अंतरात गजर ।

प्रेमाची लडिवाळ ही भाषा
स्मित हसू होते गालावर हजर ।

ओठही मग शोधतात शब्द
हळूच फुलते कळी सारून पदर ।

अंतरंगात कशी होते बरसात
बहरते तन नी वाटे मी अधर ।
Sanjay R.


शून्यात लागली नजर

शून्यात लागली नजर
मनात विचारांचे वादळ ।
भूत भविष्य दिसे सारे
गळती डोळ्यातून ओघळ ।

विश्वासाची तुटली तार
वाटे ही जीवनाची हार ।
मनाच्या होतात चिथड्या
आपलेच जेव्हा करतात वार ।
Sanjay R.


गोष्ट ही खरी

जसा अधिकारी
तसा सत्ताधारी ।
कोणी विषारी
कुणाची हुशारी ।
कोणी घरी
कोणी शेजारी ।
पेशंट आजारी
डॉक्टर बाजारी ।
सांगतो मी तरी
गोष्ट ही खरी ।
Sanjay R.


पोकळ बाता

आश्वासन पोकळ बाता
त्या शब्दांची काय किंमत ।
बोलून फक्त टळते वेळ
करायला लागते हिम्मत ।

शब्दांचे परिणाम भारी
गोडवा करी कामे सारी ।
अप शब्दांनी होतो घात
सोसावा लागे दुरावा भारी ।
Sanjay R.