Tuesday, November 29, 2022

निर्णय

आली निर्णयाची घडी
संपलेत विचार आता ।
सुचेना मनास काही
डोळ्यापुढे जन्माची गाथा ।

नकळे काही मजला
सांगू कुणास माझी व्यथा ।
नशिबाशी जुळली आहे
जीवनाची ही दीर्घ कथा ।

गरिबिशी गाठ इथे
श्रीमंत कोण आहे दाता ।
पैशाचेच आहे मोल
ठरवते पैसा सारी प्रथा ।
Sanjay R.


होईल प्रभात

एक वाट सुखाची
झाड प्रेमाचे त्यात ।
नाही दुःखाची छाया
फक्त हवे खुले हात ।

बघ वळून मागे
आहे तुलाही साथ ।
संपेल हा अंधार
मग होईल प्रभात ।

टाळू नको तू दुःख
ती सुखाची सुरुवात ।
दुखा पाठी येते सुख
मग होते बरसात ।
Sanjay R.


असत्य कुठे लपवू

सत्य किती शांत
हसते ते गालात ।
ना कुणाची भीती
नाही काही मनात ।

निर्विकार ते असे
दिसे साऱ्यास क्षणात ।
उजळून होई स्पष्ट
मिरवेल चार चौघात ।

असत्याला लपवू कुठे
दिसे ते कणा कणात ।
जगणेच होते कठीण
ठेवू कुठल्या गुणात ।
Sanjay R.


असत्याचा बोलबाला

शोधू कुठे मी सत्य
होतो जरी विजय ।
पराजयाची झाली सवय
मन आतच जळतंय ।
असत्याचा बोलबाला
वाटे तोच अजय ।
विचारांना लागली कीड
मनास कुठे कळतंय ।
Sanjay R.


विजय

असत्य कसे जिंकेल
होईल सत्याचा विजय ।
सत्यवचनी सदा असे
पदोपदी तोच अजय ।
असत्याला कुठे आसरा
होतो त्याच्या पराजय ।
त्रिलोकी फडके निशाण
सत्याचाच होई विजय ।
Sanjay R.