Monday, November 21, 2022

देह झाला आडवा

झाले घाव मनावर
बाण शब्दांचे टोचले ।
जखम भरता भरेना
दुःख हृदयात साचले ।

डोळ्यात अश्रूंची गर्दी
गालावरून ओघळले ।
ओठ गेलेत मिटून
शब्द गळ्यात दाटले ।

सुचेना काही कशाचे
विचार जागीच हरले ।
श्वास हळुवार झाले
छातीचे स्पंदन सरले ।

देह झाला आडवा
त्राण न कशात उरले ।
डोळे मिटून मी आता
पाय देवाचे धरले ।
संजय R.


थंड हा वारा

गार गार थंड हा वारा
अंगावर येतो शहारा ।
ऊन सकाळचे निघता
वाटे हवा उन्हाचा सहारा ।

दिवस हिवाळ्याचे आले
निसर्गाने रूप नवे ल्याले ।
हिरव्या हिरव्या पानातून
फुल पाकळी नवरंगी झाले ।

क्षणात येऊन गेले उडून
फुल पाखरू ते आले कुठून ।
मोहक पंख रंग वेगळा
क्षण आनंदाचा घेतो लुटून ।
Sanjay R.

Saturday, November 19, 2022

हवेत संस्कार

नको कशाचा विचार
सगळेच तर इथे लाचार ।
कोणी देतो होकार
कुणाचा असतो नकार ।
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती
हेच तर जीवनाचे प्रकार ।
नाही कुठला आकार
नाही कुठला उकार ।
नसले काही तरी चालेल
पण हवेत थोडे संस्कार ।
Sanjay R.


थंडी

हलकी फुलकी थंडी गुलाबी
कळलेच नाही झाली प्रभात ।

तोंडावरून घेतले पांघरुण
सोडवेना मज अंथरुणाची साथ ।

गार पाण्यात हात बुडवता


गारठली बोटं थरथरले हात ।

बोजड झाली जिव्हा कशी ती
ओठातूनही बोल निघेना ।

गरम चहाचा कप घेऊनी
थंडीचा का साथ सुटेना ।
Sanjay R.


Friday, November 18, 2022

राधा

तू हो राधा
होईल मी कृष्ण ।
कली युग हे
आहे थोडा प्रश्न ।

राधा
प्रिया कृष्णाची ।
कृष्ण
बघतो वाट गोपीची ।

गोपी कुठे गोकुळात
काय तिचा थाट ।
कृष्ण सोडून सारे
विसरतो मग वाट ।

कुठे मथुरा
कुठे वृंदावन ।
शोधती कृष्ण
सारे गोकुळ जन ।

बदलला कृष्ण
बदलली राधा ।
मार्ग प्रेमाचा
नाही साधा ।
Sanjay R.