Friday, November 18, 2022

राधा

तू हो राधा
होईल मी कृष्ण ।
कली युग हे
आहे थोडा प्रश्न ।

राधा
प्रिया कृष्णाची ।
कृष्ण
बघतो वाट गोपीची ।

गोपी कुठे गोकुळात
काय तिचा थाट ।
कृष्ण सोडून सारे
विसरतो मग वाट ।

कुठे मथुरा
कुठे वृंदावन ।
शोधती कृष्ण
सारे गोकुळ जन ।

बदलला कृष्ण
बदलली राधा ।
मार्ग प्रेमाचा
नाही साधा ।
Sanjay R.


Thursday, November 17, 2022

डॉक्टर

ताप असो वा खोकला
किव्वा असो दुर्धर आजार ।
पर्याय कुठे हो डॉक्टर ला
होतो आपणच बेजार ।

असेल दार मरणाचे जिथे
होतो डॉक्टर तिथे हजर ।
आणि परतून प्राण तिथून
लागते मृत्यू ला ही नजर ।

सेवा भाव धर्म त्यांचा
असतो सदा ते सादर ।
बघतो त्यांच्यात मी देव
करू किती मी आदर ।
Sanjay R.


देवदूत

डॉक्टर म्हणजे देवदूत
देतो जीवन संजीवनी ।
आजारातून करतो बरे
आशा जगण्याची मनी ।

बिछाण्यावर असता रोगी
वाटतो डॉक्टरचा आधार ।
यातनातून सोडवतो जेव्हा
मानतो त्या देवाचे आभार ।
Sanjay R.


कोण इथे परका

इथे कोण परका
आहे कोण वारीस ।
आई बापच करतात
मुलांची परवरिश ।

भरले आभाळ की
होते ना बारिश ।
डोळ्यात येतात अश्रू
नाही कुणाची साजिश ।

जवाबदार कोण याला
घेऊ कुणाचे मी नाव ।
संस्कार चालले सुटत
आपलेच तर देतात घाव ।
Sanjay R.


संगोपन

बाळाचे करता संगोपन
वेळही पुरेना ।
होते धावपळ किती
कष्ट कुणा कळेना ।
बाळ रडते जेव्हा
हृदयाची तुटते तार ।
आईच्या प्रेमाचा मी
सांगू किती सार ।
किंमत तिच्या दुःखाची
म्हातारपणी मिळते ।
आसव असतात डोळ्यात
दुःखात तीच जळते ।
Sanjay R.