धडधडते छाती
त्यात माझे हृदय ।
नको चुकवू आता
संथ त्याची लय ।
आठवणींनी तुझ्या
गती घेतात श्वास ।
डोळ्यांनाही का
होतात तुझेच भास ।
दूर जरी असेल
येते तुझीच याद ।
कर येकदा तू आठवण
मिळेल मजला साद ।
Sanjay R.
धडधडते छाती
त्यात माझे हृदय ।
नको चुकवू आता
संथ त्याची लय ।
आठवणींनी तुझ्या
गती घेतात श्वास ।
डोळ्यांनाही का
होतात तुझेच भास ।
दूर जरी असेल
येते तुझीच याद ।
कर येकदा तू आठवण
मिळेल मजला साद ।
Sanjay R.
मन झाले पाखरू
सांगा कसे मी धरू ।
कधी इथे कधी तिथे
शोधू आता मी कुठे ।
क्षणात घेते दूर भरारी
येते फिरुनी दिशा चारी ।
Sanjay R.
शब्दांनी दिली साथ
निघालो गीत गात ।
बोल दुःखाचे होते
सुखाचा नव्हता हात ।
आनंदाचा कुठे प्रकाश
जीवन काळोखी रात ।
भोग मी भोगतो सारे
नशीबाचीच ही बात ।
Sanjay R.
तुझ्या शब्दांचा सार
करतो मीही विचार ।
होऊन गीत फुलते
होतो आनंदाचा संचार ।
कधी गुणगुणतो ते शब्द
कधी भावनांशी जुळतो ।
कधी गालात मी हसतो
वाराही मग सळसळतो ।
मन झुलते दूर गगनात
साथ पक्षीही मग देतात ।
चोहीकडे होते किलबिल
वाटे गीत तुझेच ते गातात ।
Sanjay R.