तुला देतो मी गुलाब
तू मोगरा तरी दे ।
जाईल सुकून पाकळ्या
गंध असाच दरवळू दे ।
गुलाब तुझा आवडता
आवडे मज मोगरा ।
फुलांची होऊ दे बरसात
गंध प्रीतीचा साजरा ।
Sanjay R.
साथ तुझी मज हवी
ओळख अजूनही वाटते नवी ।
शोधतो सारे आकाश मी
तळपतो का तिथे तो रवि ।
आभास सारे मनाचे
तरीही वाटते तूच हवी हवी ।
Sanjay R.
म्हातारपण हे कसे
करते माणसा लाचार ।
सुचेना काही कशाचे
सरतात सारे विचार ।
हात पाय चालेना
हवा काठीचा आधार ।
लेक्रास असे का वाटे
माय बाप ते बेकार ।
पडतो विसर साऱ्याचा
प्रेम माया जणू आटते ।
वृद्धाश्रमी देतो धाडून
काहीच कसेना वाटते ।
आई बापाचे का हे नाते
आला कसा त्यात विकार ।
पडतात सांगा कमी कुठे
की हरले आता हो संस्कार ।
Sanjay R.
बंद डोळ्याआड
आहेत किती स्वप्न ।
मन घेते भरारी
त्यालाच जमत ते जपणं ।
उघड्या डोळ्यांनी बघतो
प्रत्यकाचं इथे खपण ।
ही जमीन ते आकाश
यातच करायचं जगणं ।
Sanjay R.