आईच तर देते तुम्हा
आपल्या घासातला घास
सोसूनिया दुःख सारे
घालते रे तुज जन्मास ।
दिवसा मासा वाढविते
रोकुनी स्वतःचे श्वास ।
वृद्धापकाळ का असा
असतो तिला तुझा ध्यास ।
धडून का तोडतो असा
तिचा रे तू विश्वास ।
Sanjay R.
Thursday, November 10, 2022
आईचा विश्वास
वृद्धाश्रम
नको वाटते ती वाट
नकोच तिथला थाट ।
जायचे नसते तिकडे
मुलच रचतात घाट ।
नाही बोलायला कोणी
फक्त झोपायला खाट ।
वृद्धाश्रम नकोच कोणा
तुटते नात्याची गाठ
असते नुसती रात्र
सरते जीवनाची पहाट ।
Sanjay R.
लोभ
आयुष्यभर सोबतीला दुःख
मधे मधे मिळते मात्र सुख ।
हसत खेळत जगतो जीवन
तरी पैशाची थोडी असतेच भूक ।
पैसा पैसा सांगा पुरतो कुठे
लोभा मागे मग लोभ सुटे …।
नसेल जवळ जर पैसा
नाती गोती सारेच सुटे ।
Sanjay R.
Subscribe to:
Posts (Atom)