Monday, November 7, 2022

शिकायला नको वय

शिकायला नको वय
फक्त मनात हवी लय ।
इच्छा हवी शिकण्याची
नक्कीच होतो विजय ।
Sanjay R.


जाऊ कसे दूर

सोडून मी तुला
जाऊ कसे दूर ।
मनाचे कळत नाही
लागते हुर हूर ।

असता तू जवळ
लागतो कसा सुर ।
आठवणीत तुझ्या
येतो डोळ्यात पुर ।

दिसेना तू जराशी
मन होते आतुर ।
वाटतो जमला इथे
का असा हा धूर ।
Sanjay R.


आशेचा हिंदोळा

आशेचा तो हिंदोळा
झुलते मन त्यावर ।
नको त्या आठवणी
अंकुश नसतो मनावर ।
घेते धाव तुजपाशी
थांबेना ते क्षण भर ।
Sanjay R.


मनाची व्यथा

मन सांगते कथा
आहे त्यात व्यथा
द्यावे सोडून सारे
हीच आहे गाथा ।
Sanjay R.


मन झुलते हिंदोळ्यावर

मनात वसते आशा
पण पदरात निराशा ।
चले द्वंद या मनात
कशी ही अभिलाषा ।

कधी झुले हिंदोळ्यावर
मन घेते अविरत झोके ।
वाट शोधते सुखाची
दुःख होते तिथे फिके ।

मनाचा जुळता धागा
होते मिलन मनाचे ।
अवघड हे मन किती
आहे बहुत गुणाचे ।
Sanjay R.