Monday, November 7, 2022

रोज नवे भास

मनात का हा ध्यास
रोज होतात नवे भास ।
स्वप्न म्हणू की सत्य
मधेच थांबतात श्वास ।

शोधतो शून्य जेव्हा मी
सरतात सारे आभास ।
शमते वादळ मनातले
ग्वाही देतो मग विश्वास ।
Sanjay R.


नको आता आधार

माझाच मी पेलतो
आहे थोडासा भार ।
जाते वेळी शेवटी
देतात चौघेच आधार ।
तेव्हाच का होतो मी
हा असा लाचार ।
निघेना मार्ग कुठला
करू किती मी विचार ।
छोटे मोठे सारे थकले
करतात आपलेच प्रहार ।
करून प्रहार सारेच
घेतात करून उद्धार ।
Sanjay R.


सय्यम थोडा हवा

मनाच्या किती अवस्था
कधी भरून येते प्रेम ।
केव्हा होईल भडका
नसतो कशाचा नेम ।
सय्यम थोडा हवाच
क्रोधावर शांतीचा गेम ।
Sanjay R.


अंकुश जरा ठेवा

थोडा अंकुश जरा ठेवा
मिळेल त्याचा मेवा ।
क्रोधात होतो विनाश
करता मग देवा देवा ।
कराल जर थोडी सेवा
सोडून जरासा हेवा ।
सार्थक होते जीवनाचे
तोच आयुष्याचा ठेवा ।
Sanjay R.


क्रोध

विनाशाचे मूळ कारण
आहे फक्त क्रोध ।
करा कितीही शोध
हा एकच आहे बोध ।
Sanjay R.