आशेचा तो हिंदोळा
झुलते मन त्यावर ।
नको त्या आठवणी
अंकुश नसतो मनावर ।
घेते धाव तुजपाशी
थांबेना ते क्षण भर ।
Sanjay R.
Monday, November 7, 2022
आशेचा हिंदोळा
मन झुलते हिंदोळ्यावर
मनात वसते आशा
पण पदरात निराशा ।
चले द्वंद या मनात
कशी ही अभिलाषा ।
कधी झुले हिंदोळ्यावर
मन घेते अविरत झोके ।
वाट शोधते सुखाची
दुःख होते तिथे फिके ।
मनाचा जुळता धागा
होते मिलन मनाचे ।
अवघड हे मन किती
आहे बहुत गुणाचे ।
Sanjay R.
ग्रहण
तुझ्या असण्या नसण्यात
बिघडते कुठे काय ।
डोक्याला असते टेन्शन
मात्र गोष्टीला फुटतात पाय ।
ग्रहणात जातो म्हणे सूर्य
पृथ्वीवर सांगा त्याचे काय ।
होईल थोडा अंधार काळा
प्रकाशाला का लगणार हाय ।
नुकसान नफा होऊ दे सारे
ग्रहणाशी त्याचा संबंध काय ।
दानविर येथे आहेत बरेच
दारावरून चंद्र जाणार नाय ।
Sanjay R.
झाली दिवाळी आली थंडी
आली आली आणि
आता झाली दिवाळी ।
थंडी ने दिली हाक
आता ऐकायची आरोळी ।
गाराठतील हाताची बोटे
जपायचे कसे गाल ।
शोधू कुठे सांग मला
हवी ती काश्मिरी शाल ।
नाही कुणास साधे कपडे
होतील त्यांचे हाल ।
कोणी अंथरुणा विना इथे
हवी त्यांना ही शाल ।
Sanjay R.