आली आली आणि
आता झाली दिवाळी ।
थंडी ने दिली हाक
आता ऐकायची आरोळी ।
गाराठतील हाताची बोटे
जपायचे कसे गाल ।
शोधू कुठे सांग मला
हवी ती काश्मिरी शाल ।
नाही कुणास साधे कपडे
होतील त्यांचे हाल ।
कोणी अंथरुणा विना इथे
हवी त्यांना ही शाल ।
Sanjay R.
आली आली आणि
आता झाली दिवाळी ।
थंडी ने दिली हाक
आता ऐकायची आरोळी ।
गाराठतील हाताची बोटे
जपायचे कसे गाल ।
शोधू कुठे सांग मला
हवी ती काश्मिरी शाल ।
नाही कुणास साधे कपडे
होतील त्यांचे हाल ।
कोणी अंथरुणा विना इथे
हवी त्यांना ही शाल ।
Sanjay R.
निर्दोष हा मी असा
कळेना दोष कुणाचा ।
नाही उरला अंकुश
या अपराधी मनाचा ।
कळेचना मनाचे काही
आहे गुंतले कशात ।
वळून बघतो मी जेव्हा
जातो भलून हास्यात ।
नजरेत असते आस
संथही झालेत श्वास ।
उठता जगता आता
होतात फक्त भास ।
Sanjay R.
दरवर्षीच तर येते
पहिली कुठे असेल ।
तेच ते असते जरी
आनंद मत्र होतो
असतो कुठे कमी ।
आली आली दिवाळी
करू काय सांगा तुम्ही ।
Sanjay R.
असो दसरा
वा असो दिवाळी ।
दिवस सारखेच
नाही नव्हाळी ।
बाजार कसा
दिसतो फुलून ।
खिसा रिकामा
होतो फिरून ।
दिवे पणत्या
कपडे नवे ।
जो तो म्हणतो
मलाही हवे ।
लाडू करंजी
सोबत चिवडा ।
काय खायचे
तुम्हीच निवडा ।
झकपक झकपक
दिव्यांच्या माळी।
झोपडीत बघा
कशी रात्र काळी ।
Sanjay R.
अजूनही हवी खिडकी
बाहेर बघत बसायचे ।
खिडकी बाजूची जागा
न मिळाल्यास रुसायचे ।
मिळता खिडकी बाजूला
गालात थोडे हसायचे ।
विरंगुळा होतो छान
आरामात बघत बसायचे ।
Sanjay R.