Monday, November 7, 2022
शुभेच्छा दिवाळीच्या
खिडकी मनाची
खिडकी मनाची बंद
आतल्या आत धुंद ।
दरवळतो जेव्हा गंध
अनायास होते बेधुंद ।
लागतो मग एक छंद
होतात श्वास मंद ।
आस तुझी मनात
झालो आता अंध ।
नाव तुझे आणि माझे
होईल का येक संध ।
Sanjay R.
प्रवास जीवनाचा नाही सोपा
प्रवास जीवनाचा
नाही सोपा ।
अडथळे किती इथे
थोडे स्वतःला जपा ।
चार पावले चालता
टोचतो काटा ।
बदलायच्या कश्या
परत परत वाटा ।
कधी ऊन पाऊस
उध्वस्त करतो वारा ।
जगण्यावरही असतो
दुःखाचा पहारा ।
दुखःविना सुख कुठे
रोज होते पहाट ।
विसरून दुःख सारे
मांडायचा थाट ।
Sanjay R.
Sunday, November 6, 2022
प्रहार
झेलू किती मी प्रहार
होतात किती वार ।
इकडे बघू की तिकडे
आहेत दिशा इथे चार ।
असह्य होते सारेच
सहन होईना मार ।
जड झाले सारे
उचलू कसा मी भार ।
जिकण्याचा विचार दूर
करतो स्वीकार हार ।
Sanjay R.
तू सुंदरा
सौंदर्यवती तू सुंदरा
काय तुझी ही तऱ्हा ।
रूप अविस्मरणीय हे
हिरवी हिरवी धरा ।
रंगांची उधळण इथे
धुंद गन्ध घेतो फेरा ।
पक्षी गुणगूणती गाणे
वाटे मजला ती स्वरा ।
झुळझुळ वाहे पाणी
मेघ बरसतो जरा जरा ।
निळे निळे आकाश वर
लुकलुकती सूर्य चन्द्र तारा ।
Sanjay R.