Friday, October 14, 2022

नातेच खोटे

सर्वस्व लावून पणाला
लहानाचे करतात मोठे ।
प्रेम पैसा काळजी किती
वाटते इतर नातेच खोटे ।
माय बापाची माया कशी
वाटे लेकास ठेऊ कुठे ।
लेक होतो जेव्हा मोठा
आईबाप त्यास नको वाटे ।
Sanjay R.


आश्रय

वर आकाश
खाली धरती ।
नाही छत
डोक्यावरती ।

शोधू कुठे मी
आश्रय आता ।
सांग तू रे
तूच विधाता ।

पोटास लागे
अन्न पाणी ।
हातास काम
जीवन कहाणी ।

आश्रयास जरी
आहे ही धरा ।
नशीब ठरविते
आयुष्याचा फेरा ।
Sanjay R.


करवा चौथ

बघू दे चंद्राचे मुख
केला निर्जल उपवास ।
राहवत नाही आता
थांबतील का असेच श्वास ।
जेवणात आहे पंचपक्वान्न
लागला त्यांचाच ध्यास ।
ये ये रे चंद्रा आता
तुझ्या दर्शनाची आहे आस ।
करवा चौथ आहे आज
दिवस आहे किती खास ।
तुझ्या दर्शना शिवाय रे
जाईल कसा पोटात घास ।
Sanjay R.


चांद्रमुखी

शीतल तो चन्द्र
नि तू चंद्रमुखी ।
सूर्य तिथे का
होतो दुःखी ।

तळतळाट का
होतो त्याचा ।
होणार तू
कशी सुखी ।

शांत कोमल
पण अंधारी ।
रात्र जाते
कुणाची चुकी ।

सुर्याविना का
कुठे प्रकाश ।
मात्र तू तर
ती चंद्र मुखी ।
Sanjay R.


चंद्रकोर

सुंदरा तू अप्सरा
तू कोर ग चंद्राची ।
भीर भीर तुझी नजर
अवस्था बघ मनाची ।
Sanjay R.