शीतल तो चन्द्र
नि तू चंद्रमुखी ।
सूर्य तिथे का
होतो दुःखी ।
तळतळाट का
होतो त्याचा ।
होणार तू
कशी सुखी ।
शांत कोमल
पण अंधारी ।
रात्र जाते
कुणाची चुकी ।
सुर्याविना का
कुठे प्रकाश ।
मात्र तू तर
ती चंद्र मुखी ।
Sanjay R.
शीतल तो चन्द्र
नि तू चंद्रमुखी ।
सूर्य तिथे का
होतो दुःखी ।
तळतळाट का
होतो त्याचा ।
होणार तू
कशी सुखी ।
शांत कोमल
पण अंधारी ।
रात्र जाते
कुणाची चुकी ।
सुर्याविना का
कुठे प्रकाश ।
मात्र तू तर
ती चंद्र मुखी ।
Sanjay R.
सांगे जगण्याचा एक मार्ग
मीही अनुभवतो त्यात स्वर्ग ।
आहे सुखाची कशात जाण
जाणा आनंदाची जिथेच खाण ।
जो परोपकार करुनिया सारा
तो चमचमतो स्वतः ही तारा ।
न्याय अन्याय जे ज्ञान विज्ञान
त्यासी धर्माचरण करी सज्ञान ।
जाणितो सारेच तत्व जोही
धर्मवीर तो रक्षितो सर्व काही ।
Sanjay R.
तान्हा बाळ रडता
घेई उचलून आई ।
झोपविण्या त्यासी
गीत गाते गाई गाई ।
भरविते घास त्यासी
चिंता स्वतःची नाही ।
नाही तुलना ममतेची
असते अशीच आई ।
Sanjay R.
मार्ग कठीण प्रेमाचा
दम जातो सगळ्यांचा ।
प्रेम करणे जितके सोपे
निभावणं तितकंच कठीण ।
पावलो पावली निखारे
स्वाहा होतात स्वप्न सारे ।
अंत होतो जीवनाचा
सापळाच जणू मृत्यूचा ।
इतिहासाची पाने पलटा
दिसेल दुःखाचा डोंगर उलटा ।
Sanjay R.