तान्हा बाळ रडता
घेई उचलून आई ।
झोपविण्या त्यासी
गीत गाते गाई गाई ।
भरविते घास त्यासी
चिंता स्वतःची नाही ।
नाही तुलना ममतेची
असते अशीच आई ।
Sanjay R.
Friday, October 14, 2022
आई
मार्ग प्रेमाचा
मार्ग कठीण प्रेमाचा
दम जातो सगळ्यांचा ।
प्रेम करणे जितके सोपे
निभावणं तितकंच कठीण ।
पावलो पावली निखारे
स्वाहा होतात स्वप्न सारे ।
अंत होतो जीवनाचा
सापळाच जणू मृत्यूचा ।
इतिहासाची पाने पलटा
दिसेल दुःखाचा डोंगर उलटा ।
Sanjay R.
Thursday, October 13, 2022
लैला मजनू
लैला आणि मजनू
एक प्रेम कहाणी ।
कोई पत्थरसे ना मारे
सुंदर त्यातली गाणी ।
सुपरहिट झाला पिक्चर
बघितला का कोणी ।
अंत होतो दोघांचा
हीच प्रेमाची निशाणी ।
Sanjay R.
मार्ग विनाशाचा
डोक्यात येता अविचार
बदलतो सगळा आचार ।
आपोआप वळतात पाय
मार्ग विनाशाचा लाचार ।
निष्पन्न असतात शून्य
होतो फक्त प्रचार ।
Sanjay R.
विनाशाचा मार्ग
युक्रेन रशियाचे
भडकले युद्ध ।
पूल तोडून युक्रेनने
केले रशियाशी क्रुद्ध ।
भोगतोय आता फळ
हरपली शुद्ध ।
होईल कसे शांत
सांगा दोन शब्द ।
युक्रेन च्या नागरिकांचे
कसे ते प्रारब्ध ।
सोसताहेत बिचारे
थोपवलेले युद्ध ।
विनाशाचा तो मार्ग
सारे जग स्तब्ध ।
Sanjay R.