Thursday, October 13, 2022

लैला मजनू

लैला आणि मजनू
एक प्रेम कहाणी ।
कोई पत्थरसे ना मारे
सुंदर त्यातली गाणी ।
सुपरहिट झाला पिक्चर
बघितला का कोणी ।
अंत होतो दोघांचा
हीच प्रेमाची निशाणी ।
Sanjay R.


मार्ग विनाशाचा

डोक्यात येता अविचार
बदलतो सगळा आचार ।
आपोआप वळतात पाय
मार्ग विनाशाचा लाचार ।
निष्पन्न असतात शून्य
होतो फक्त प्रचार ।
Sanjay R.


विनाशाचा मार्ग

युक्रेन रशियाचे
भडकले युद्ध ।
पूल तोडून युक्रेनने
केले रशियाशी क्रुद्ध ।
भोगतोय आता फळ
हरपली शुद्ध ।
होईल कसे शांत
सांगा दोन शब्द ।
युक्रेन च्या नागरिकांचे
कसे ते प्रारब्ध ।
सोसताहेत बिचारे
थोपवलेले युद्ध ।
विनाशाचा तो मार्ग
सारे जग स्तब्ध ।
Sanjay R.


कोजागिरी

पौर्णिमेचा चंद्र आज
घेऊन कोजागिरी आला ।
चंद्रप्रकाशात तापले दूध
अमृताचा गंध देऊन गेला ।
Sanjay R.


आई बाबा

हवे आई बाबांचे आशीर्वाद
यावर कोण करील वाद ।
तरीही मुलं का असे
त्याना एकदम विसरतात ।
Sanjay R.