Thursday, October 13, 2022

नकोच वाटतं आता

नकोच वाटतं आता
करावं कुठे काम ।
घर काय बाहेर काय
मिळतो कुठे आराम ।

उठल्या पासून राबते
जीव जातो थकून ।
क्षणभर नाही उसंत
वाटतं द्यावं सगळं टाकून ।

किंमत नाही कामाची
सगळे सोडतात ऑर्डर ।
मी सोडून जसे बाकी सारे
सांभाळतात जणू बॉर्डर ।
Sanjay R.



हाऊस वाईफ

नोकरी एकदाची परवडली
संपता संपेना घरातले काम ।

सकाळ पासून होते सुरवात
विसरून जाते भूक तहान ।

डोंगर असतो कामाचा
तिच्या मुळेच घराची शान ।

झणझणीत चांगले मिळे खाण्यास
मन ओतून ती करते छान ।

मुलांचा अभ्यास, घरातली खरेदी
उपयोगी पडते तिचेच ज्ञान ।

विचार थोडा करून बघा
तिच्या मुळेच तर तुमचा मान ।

तक्रार नसते कुठे कशाची
हाऊस वाईफ चा करा सन्मान ।
Sanjay R.


Wednesday, October 5, 2022

स्त्री देवीचे रूप

कराल स्त्री चा सम्मान
मिळेल तुम्हालाही मान ।
स्त्रीच तर असते
घराघरातली शान ।

स्त्री तर असते देवीचे रूप
अंबा जगदंबा दुर्गा ती ।
कधी रौद्र ,तर कधी कोमळ,
माया,ममता, प्रेमळ तिचे स्वरूप ।
Sanjay R.


रावण दहन

चला करू या आपण
दुष्ट प्रवृत्तीचे दहन ।
विषय हा कुठे हो
आहे इतका गहन ।

दुष्टांचे अत्याचार किती
नाही होत सहन ।
चला करू या आपण
या रक्षसांचे दहन ।

फायदा उचलून तुमचा
सत्कार्याचा होतो अपमान ।
कोण आहे इथे सांगा हो
मिळेल का कोणी महान ।
Sanjay R.


Monday, October 3, 2022

तीन बंदर

बापू तुमचे तीन बंदर
गेले सांगून किती सुंदर ।

एकाचा हात कानावर
म्हणतो वाईट ऐकू नका ।

दुसऱ्याच हात तोंडावर
म्हणतो तो वाईट बोलू नका ।

तिसऱ्याचा हात डोळ्यावर
तो म्हणतो वाईट बघू नका ।

किती अर्थपूर्ण हे चित्र
आहे संदेश हा जीवनाचा ।

केले जर हे पालन सारे
नक्कीच सुख लाभेल प्रत्येकाला ।

Sanjay R.