Thursday, October 13, 2022
स्वागत दिवाळीचे
संपले नवरात्र
दहन झाले रावणाचे ।
आहेत आत्ता सारे
दिवसच आनंदाचे ।
झाला मस्त दसरा
स्वागत आता दिवाळीचे ।
खिसा जरा सांभाळा
आहेत दिवस खर्चाचे ।
सदरा साडी पॅन्ट सांगा
कुणास काय घ्यायचे ।
फराळ पाणी गिफ्ट सारे
कुणाकुणास वाटायचे ।
बोनस जाईल असाच मग
दागिने कसे घडवायचे ।
गरम होईल वातावरण
सांगा कसे सांभाळायचे ।
Sanjay R.
नको काळजी
वेळ आली की होते सारे
चिंता कशास करतो तू रे ।
नको काळजी आता कशाची
प्रयत्नांपुढे तर दुःखही हारे ।
Sanjay R.
आभाळाची काया
नवरंगाने नटली ही
आभाळाची काया ।
धगधगता सूर्य बघा
सरली त्याची माया ।
वारा गार छेडतो मज
झाले बेभान हे मन ।
पदर थांबेना खांद्यावर
सांग झाकू कसे मी तन ।
कसे सांभाळू मी मज
नजरेत भरला ज्वर ।
दूर सळसळली वीज
आली धावून सर ।
Sanjay R.
वाट तुझी मी पाहते
जन्मोजन्मीचे हे नाते
वाट तुझी मी पाहाते ।
नाही सोसवत रे आता
एकाकी मजसी वाटते ।
ये ना तू परत एकदा
सात जन्माचे कसे हे नाते ।
का गेलास तू सोडून मजला
मीही आता तिथेच येते ।
Sanjay R.
मातेचे गुणगाण
नवरात्री चे आयोजन
माँ दुर्गाचे करू नमन ।
अंबा जगदंबा तू काली
माते कीर्ती तुझी महान ।
दुराचाऱ्यांचा करी विनाश
अष्टभुजा ग तुझीच शान ।
मनोकामना होई पूर्ण
करील जोही तुझे ध्यान ।
जय आंबे जय जगदंबे
भक्तिभावे करतो गुणगान ।
Sanjay R.
Subscribe to:
Posts (Atom)