Thursday, October 13, 2022

आभाळाची काया

नवरंगाने नटली ही
आभाळाची काया ।
धगधगता सूर्य बघा
सरली त्याची माया ।

वारा गार छेडतो मज
झाले बेभान हे मन ।
पदर थांबेना खांद्यावर
सांग झाकू कसे मी तन ।

कसे सांभाळू मी मज
नजरेत भरला ज्वर ।
दूर सळसळली वीज
आली धावून सर ।
Sanjay R.


वाट तुझी मी पाहते

जन्मोजन्मीचे हे नाते
वाट तुझी मी पाहाते ।
नाही सोसवत रे आता
एकाकी मजसी वाटते ।
ये ना तू परत एकदा
सात जन्माचे कसे हे नाते ।
का गेलास तू सोडून मजला
मीही आता तिथेच येते ।
Sanjay R.


मातेचे गुणगाण

नवरात्री चे आयोजन
माँ दुर्गाचे करू नमन ।
अंबा जगदंबा तू काली
माते कीर्ती तुझी महान ।
दुराचाऱ्यांचा करी विनाश
अष्टभुजा ग तुझीच शान ।
मनोकामना होई पूर्ण
करील जोही तुझे ध्यान ।
जय आंबे जय जगदंबे
भक्तिभावे करतो गुणगान ।
Sanjay R.


नकोच वाटतं आता

नकोच वाटतं आता
करावं कुठे काम ।
घर काय बाहेर काय
मिळतो कुठे आराम ।

उठल्या पासून राबते
जीव जातो थकून ।
क्षणभर नाही उसंत
वाटतं द्यावं सगळं टाकून ।

किंमत नाही कामाची
सगळे सोडतात ऑर्डर ।
मी सोडून जसे बाकी सारे
सांभाळतात जणू बॉर्डर ।
Sanjay R.



हाऊस वाईफ

नोकरी एकदाची परवडली
संपता संपेना घरातले काम ।

सकाळ पासून होते सुरवात
विसरून जाते भूक तहान ।

डोंगर असतो कामाचा
तिच्या मुळेच घराची शान ।

झणझणीत चांगले मिळे खाण्यास
मन ओतून ती करते छान ।

मुलांचा अभ्यास, घरातली खरेदी
उपयोगी पडते तिचेच ज्ञान ।

विचार थोडा करून बघा
तिच्या मुळेच तर तुमचा मान ।

तक्रार नसते कुठे कशाची
हाऊस वाईफ चा करा सन्मान ।
Sanjay R.