चला करू या आपण
दुष्ट प्रवृत्तीचे दहन ।
विषय हा कुठे हो
आहे इतका गहन ।
दुष्टांचे अत्याचार किती
नाही होत सहन ।
चला करू या आपण
या रक्षसांचे दहन ।
फायदा उचलून तुमचा
सत्कार्याचा होतो अपमान ।
कोण आहे इथे सांगा हो
मिळेल का कोणी महान ।
Sanjay R.
चला करू या आपण
दुष्ट प्रवृत्तीचे दहन ।
विषय हा कुठे हो
आहे इतका गहन ।
दुष्टांचे अत्याचार किती
नाही होत सहन ।
चला करू या आपण
या रक्षसांचे दहन ।
फायदा उचलून तुमचा
सत्कार्याचा होतो अपमान ।
कोण आहे इथे सांगा हो
मिळेल का कोणी महान ।
Sanjay R.
बापू तुमचे तीन बंदर
गेले सांगून किती सुंदर ।
एकाचा हात कानावर
म्हणतो वाईट ऐकू नका ।
दुसऱ्याच हात तोंडावर
म्हणतो तो वाईट बोलू नका ।
तिसऱ्याचा हात डोळ्यावर
तो म्हणतो वाईट बघू नका ।
किती अर्थपूर्ण हे चित्र
आहे संदेश हा जीवनाचा ।
केले जर हे पालन सारे
नक्कीच सुख लाभेल प्रत्येकाला ।
Sanjay R.
सत्य एक विचार
पाळतो कोण आचार ।
असत्याचा बोलबाला
सत्यच होते लाचार ।
बापू तुमची अहिंसा
नाही तिला आधार ।
जातील किती बळी
लावतात ते धार ।
सस्वावलंबाची शिकवण
विसरतो ती आठवण ।
लोभ होतो विजयी
पैशासाठी काहीपण ।
स्वच्छतेचा रटला पाढा
कचऱ्यातच वाटते बरे ।
विसरलो विचार तुमचे
सांगतो मी खरे खरे ।
Sanjay R.
विचारांच्या सागरातून
निघते जेव्हा याद ।
अंतरात होते स्पंदन
नी मन देते साद ।
नभातून डोकावण्यास
मिळे चंद्रास वाट ।
चंद्र चांदणीची गगनात
होते मग गाठ ।
चाले खेळ प्रेमाचा
उधळतात रंग ।
मनमोहिनी रजनी तिला
काळोखाचा संग ।
Sanjay R.
प्रेमाची कुठे कथा
ती तर फक्त व्यथा ।
लिहायला घेतली तर
होईल मोठ्ठी गाथा ।
फक्त सहन करायचे
हीच तर आहे प्रथा ।
बंड कुणाचं चालतं
फुटतो त्यात माथा ।
शांती हवी थोडी
सांगतो जाता जाता ।
Sanjay R.