Monday, October 3, 2022

बदला

मैत्रीत कशाचा बदला
निघतो मार्ग मधला ।
एक पाऊल मागे पुढे
वादच तिथे सम्पला ।
Sanjay R.


वादा

बेचैन झाले मन
बघून तुझी ती अदा ।
बघ वळून जरा
करू नकोस मन तू जुदा ।
नकळत जाणलं मी
आपण व्हावं एक सदा ।
मनाने कौल केव्हाच दिला
कळेल तुला हा माझा वादा ।
Sanjay R.


गंध जुना

तुझ्या विना कसा हा
एक एक क्षण जाईना ।
येते तुझीच आठवण
कळेल का मनाची दैना ।

सारखं वाटतं भेटावं
शोधते नजर तुला ।
परतून तू ये जरा
सोसवेना विरह मला ।

रोज बघते जाऊन तिथे
शोधते तुझ्या पाऊल खुणा ।
तेच फुल तोच गुलाब
मात्र हरवला गंध जुना ।
Sanjay R.


भेट

भेटायचं म्हणून तू
का रे केलास वादा ।
कळलं मज सारं
आणि तुझा तो इरादा ।
Sanjay R.


रिटेक

जीवनाचा प्रवास हा
इथे प्रवासी अनेक ।
आज ज्याची होते भेट
भरोसा नाही होईल रिटेक ।

दिवसा मागे दिवस जाता
हळू हळू सुटतो एकेक ।
शेवटाला उरतो कोण
धरतो धुरा तुमचाच लेक ।
Sanjay R.