प्रेमाची कुठे कथा
ती तर फक्त व्यथा ।
लिहायला घेतली तर
होईल मोठ्ठी गाथा ।
फक्त सहन करायचे
हीच तर आहे प्रथा ।
बंड कुणाचं चालतं
फुटतो त्यात माथा ।
शांती हवी थोडी
सांगतो जाता जाता ।
Sanjay R.
Monday, October 3, 2022
प्रेमकथा
गडबड
उरले कुठे गुपित
झाले सारेच उघड
झाला कसा घोटाळा
जीभ करते बडबड ।
थोडाश्याने होते मग
सगळीच हो गडबड ।
Sanjay R.
वादा
बेचैन झाले मन
बघून तुझी ती अदा ।
बघ वळून जरा
करू नकोस मन तू जुदा ।
नकळत जाणलं मी
आपण व्हावं एक सदा ।
मनाने कौल केव्हाच दिला
कळेल तुला हा माझा वादा ।
Sanjay R.
गंध जुना
तुझ्या विना कसा हा
एक एक क्षण जाईना ।
येते तुझीच आठवण
कळेल का मनाची दैना ।
सारखं वाटतं भेटावं
शोधते नजर तुला ।
परतून तू ये जरा
सोसवेना विरह मला ।
रोज बघते जाऊन तिथे
शोधते तुझ्या पाऊल खुणा ।
तेच फुल तोच गुलाब
मात्र हरवला गंध जुना ।
Sanjay R.
Subscribe to:
Comments (Atom)