Monday, September 26, 2022

वेदना झाली रीती

मनातले दुःख
मनातच असू दे ।
चेहऱ्यावर मात्र
मला तू हसू दे ।

दुःखाला असते
कुणाची साथ ।
पाठीवर नाही
कुणाचा हात ।

आसवांची काय
किंमत इथे ।
डोळ्यातच असे दे
जिथले तिथे ।

फाटले हृदय तरी
हुंदका नको गळ्यात ।
निर्विकार असू दे
मज चार चौघात ।

माझे मीच झेलील
दुःख असू दे किती ।
वेदना आतली
झाली आता रीती ।
Sanjay R.


दोष नशिबाचा

हसतो मी सदा
दुःख जरी मागे ।
बंद डोळयांत अश्रू
डोळे उघडे जागे ।

देतो कोण हो साथ
नाही मदतीची आशा ।
कुणास काय तुमचे
देतील फक्त निराशा ।

भोग भोगेले कोण
दोष हा नशिबाचा ।
सहन करतो सारे
प्रहार तो प्रारब्धाचा ।

लपलेले दुःख सारे
कुणास हवा पुरावा ।
फक्त जाणतो देवच
करतो त्याचाच धावा ।
Sanjay R.


यश अपयश

जीवनात नशीबाचा जोर
कुणी गरीब कुणी थोर ।
जिद्द चिकाटी हवी थोडी
मेहनतीची ही हवी जोड ।
प्रयत्नाची ही हवी साथ
कष्टाची तर नाहीच तोड ।
नको मग चिंता कशाची
फळ मिळते गोड गोड ।
यशाचाही गर्व नकोच
लावू नका कशाशी होड ।
Sanjay R.


व्यवसाय

काय कसला व्यवसाय
वाटतो जसा अन्याय ।
जेव्हा तेव्हा पकडा
ग्राहकांचेच हो पाय ।
लोकांना पटवणे कठीण
खरेखोटे सांगा काय काय ।
चालतो दिवसभर सदा
हा नेहमीचाच व्यवसाय ।
उरतात चार पैसे तेव्हा
प्रश्न पोटाचा हाच हाय ।
Sanjay R.


कामाची कशाला लाज

कामाची कशाला लाज
डोक्यावरती चढतो साज ।
स्वकष्टाला किंमत फार
उद्या करायचे ते करा आज ।
कर्म हाच तर धर्म आहे
मनास वाटतो त्याचाच नाज ।
Sanjay R.