Saturday, September 24, 2022

शक्ती

शब्दाइतकी कशात शक्ती
वेगळी प्रवृत्ती जितक्या व्यक्ती ।
असे कोणी असा धार्मिक
चाले त्याची सदा भक्ती ।
कुणास असे इतकी चिंता
हवी त्याला नुसती मुक्ती ।
जीवनाचा हा मार्गच कठीण
पैशाची आहे इथे आसक्ती ।
करू नका हो छळ कुणाचा
पडेल उघडी सारी युक्ती ।
Sanjay R.


मस्ती

हॉस्टेल म्हणजे घर नव्हे
चालते नुसती दंगा मस्ती ।
अभ्यासाचे ढोंग सारे
पोरा पोरांचीच तिथे वस्ती ।
Sanjay R.


हॉस्टेल

हॉस्टेल चे जीवन कसे
वाटे कसे ते स्वच्छंद ।
पण बंधने तिथे फार
नसतो कुठलाच आनंद ।
जेवणाचे होतात हाल
वाटते खावे याहून कंद ।
द्यावे सोडून सारेच नि
टाकावे तोडून सारे बंध ।
Sanjay R.


फ्री चा जमाना

फ्री चा हो आता
आला हा जमाना ।
काम न करता हवा
साऱ्यांनाच खजाना ।

मिळाले फुकट जर
वाटते लॉटरी लागली ।
खर्च करून नकोच
सवय लागली चांगली ।

नसेल फुकट मिळत तर
लाचेचा काढतात दंडा ।
जिकडे तिकडे मिरवतो
फ्री रेवडीचा आता झेंडा ।

सांगतो आता सुधारा सारे
जगायचा एकच रस्ता ।
समोरच्याचा कापा खिसा
ठेवा पैशाशीच वास्ता ।
Sanjay R.

स्वप्नात मॉल

स्वप्न बघितले काल
लागली मला लॉटरी ।
काय करावे सुचेना
म्हटलं टाकावी फॅक्टरी ।

कारखान्याचा मालक मी
कामगारांनी वेढले ।
सुचेना मला काहीच
स्वप्न ते मी सोडले  ।

थाटामाटात गेलो मी
मोठ्या एका मॉल मध्ये ।
भरपूर केली खरेदी
पैसेच नव्हते खिशा मध्ये ।
Sanjay R.