Saturday, September 24, 2022
फ्री चा जमाना
स्वप्नात मॉल
स्वप्न बघितले काल
लागली मला लॉटरी ।
काय करावे सुचेना
म्हटलं टाकावी फॅक्टरी ।
कारखान्याचा मालक मी
कामगारांनी वेढले ।
सुचेना मला काहीच
स्वप्न ते मी सोडले ।
थाटामाटात गेलो मी
मोठ्या एका मॉल मध्ये ।
भरपूर केली खरेदी
पैसेच नव्हते खिशा मध्ये ।
Sanjay R.
लॉटरी
नशिबात नाही जोर
लॉटरी कशी लागेल ।
कष्टविना मिळेना काही
मेहनतीनेच नशीब जागेल ।
सहज मिळाले आयते तर
त्यास असतो एक धोका ।
किंमत नसते मग कशाची
घडतात आयुष्यभर चुका ।
कष्टविना सुख नाही
त्यातच मन होते प्रसन्न ।
आत्मचिंतन करून बघा
वाटेल तुमचे तुम्हास धन्य ।
Sanjay R.
मन गगनात घेते भरारी
क्षणात इथे तर
क्षणात असते तिथे ।
गगनात घेते भरारी
पोचते हवे तिथे ।
मधेच येते फिरून
नसेल कोणी कुठे ।
नाही अंत कशाचा
पचते मन तिथे ।
Sanjay R .
Tuesday, September 20, 2022
मनाचे रंग किती
मनाचे रंग किती
आहे किती गती ।
भ्रमण चाले सारे
नाही कुणाच्या हाती ।
अनंत त्याचे रूप
सखा तो सोबती ।
क्षणात देई सुख
पेटवी दुःखाच्या वाती ।
अभंगाचे होता भंग
दुरावते नाती गोती ।
Sanjay R.