Sunday, September 11, 2022

पावसाने केला गोंधळ

पावसाने केला गोंधळ
थांबायलाच नव्हता तयार ।
जिकडे तिकडे पाणी पाणी
पडत होती नुसती धार ।
थकून गेलो घरात बसून
कंटाळा  हो आला फार ।
रविवार पूर्ण गेला वाया
मनात राहिले मनातले विचार ।
Sanjay R....


सुंदर हा निसर्ग

निसर्ग हा सुंदर किती
करू प्रेम मी कुणावर ।
येतो कुठून हा पाऊस
भरतो कसा हा सागर ।
बरसतो पाऊस जेव्हा
होतो धरेवरती शॉवर ।
हिरवी हिरवी हो झाड
फुलतात रंगीबेरंगी फ्लॉवर ।
विलोभनीय ही धरा कशी
घालू कसा मनास मी आवर ।
प्रेमात मी पडलो तिच्या
आता तूच मला ग सावर ।
Sanjay R....


आठवण

आठवण होते जेव्हा
असतेस तूच मनात ।
शोधतो मी जेव्हा
जातेस कुठे क्षणात ।

तुझ्या सोबत मजला
शब्द ही देतात याद ।
तस्वीर तुझी नेत्रात नि
मन मनाला देते साद ।

दे छंद तुझा मजला
आठवणीत तूच हवी ।
होताच आठवण तुझी
दिसावी तुझीच छवी ।
Sanjay R....


डाव

बोलू नको काही
सगळेच आहे ठाव ।
शब्दच देऊन गेले
हृदयावर माझ्या घाव ।
साधा सरळ मी
कशास रचेल डाव ।
कधीच नव्हती मला
काही कशाची हाव ।
Sanjay R....


म्हातारपण

नको वाटते म्हातारपण
तारुण्यच हवं मला ।
जसा आहे तसाच मी
आहे असाच मी भला ।

म्हातारपण आलं की
लागते नुसतं दुखणं ।
बिछान्यावर पडून चाले
वाट मरणाची बघणं ।

नकोच अस म्हातारपण
तरुणच राहू दे मला ।
माझं मीच करील सारं
त्रास नसेल कुणाला ।

म्हातारपण कठीण किती
नसतो कुणी बोलायला ।
टाकाऊ जशी वस्तूच ती
वाट बघतात दूर सारायला ।
Sanjay R.....