Sunday, September 11, 2022

म्हातारपण

नको वाटते म्हातारपण
तारुण्यच हवं मला ।
जसा आहे तसाच मी
आहे असाच मी भला ।

म्हातारपण आलं की
लागते नुसतं दुखणं ।
बिछान्यावर पडून चाले
वाट मरणाची बघणं ।

नकोच अस म्हातारपण
तरुणच राहू दे मला ।
माझं मीच करील सारं
त्रास नसेल कुणाला ।

म्हातारपण कठीण किती
नसतो कुणी बोलायला ।
टाकाऊ जशी वस्तूच ती
वाट बघतात दूर सारायला ।
Sanjay R.....


जन्म वाटतो अपुरा

जन्म वाटतो हा अपुरा
हवा पुनर्जन्म मजला ।
केलेच काय या जन्मी
नाही मनात दिवस सजला ।

काय करू नि काय नको
कळेना काहीच मजला ।
अजून आहे बरेच बाकी
सांगू कसे मी तुजला ।

करण्या अपुरा रे हा जन्म
परत हवा एक जन्म मजला ।
उरले सुरले करील तेव्हा
पुनर्जन्म मी मागतो तुजला ।
Sanjay R....


Saturday, September 10, 2022

पुनर्जन्म

दिवसामागून दिवस गेले
कळलेच कसे नाही ।
वर्षच आता किती उरले
तेही कळत नाही ।
किती अजून करायचं बाकी
काहीच तर केलं नाही ।
वाटतं सरू नयेत हे दिवस आता
लवकर मज मरायचं नाही ।
नसेलच जमत तर दे पुनर्जन्म
देवा मन अजून भरलं नाही ।
Sanjay R....


कमळ

फुलले चिखलात
गुलाबी हे कमळ ।
नशीब चिखलाचे
झाले सुंदर तळे ।
Sanjay R....


गोष्ट प्रेमाची खरी

प्रेम म्हणजे काय
आहे एक स्टोरी ।
मन यात करते
मनाचीच चोरी ।
सांगणे कठीणच
हाती कुणाच्या दोरी ।
प्रेम कुठे तुटते
काळी असो वा गोरी ।
प्रेमासाठी काहीही
गोष्ट होच खरी ।
हसणे रडणे एकच
प्रेमात नसते दरी ।
Sanjay R....