रंग प्रेमाचा कसा
मिळेल ज्यात तसा ।
थोडे डोळ्यात बघा
थोडे गालात हसा ।
मऊ मऊ वाटे जसे
हळूच बघतो ससा ।
नको प्रेमाची परीक्षा
आनंदी सदाच असा ।
Sanjay R...
Thursday, September 8, 2022
रंग प्रेमाचा कसा
प्रेमाविना जग सुने
नाही कुठली परीक्षा
प्रेमाविना जग सुने ।
प्रेम आईचे बळावर
त्यात होते काय उणे ।
पशु पक्षी जीव सजीव
सारेच तर प्रेम जाणे ।
प्रेमाविना तर जीवनाचे
कसे सुने वाटे गाणे ।
Sanjay R.
प्रेम परीक्षा
मार्ग हा प्रेमाचा
नाही साधा सरळ ।
दिले तेवढे मिळेल
नाहीतर मनाचा छळ ।
वाटेवर काटे अती
दयावी लागे परीक्षा ।
तुटतो बंध जेव्हा
वाटे हीच ती शिक्षा ।
Sanjay R.
स्वप्नांना पंख
होतील पूर्ण सारे
स्वप्नांना हवेत पंख ।
पोचता शिखरावर
वाजतो मग शंख ।
प्रयत्न हवेत थोडे
कोण राजा कोण रंक ।
नशीब ही फिरेल मग
यशाला अपयशाचा डंख ।
Sanjay R.
दुनियादारी
थोडी हुशारी
थोडी कलाकारी
विना मारा मारी
जिंकली बारी
ज्यास देव तारी
त्यास कोण मारी
घडते वारी नी
पडते मग भारी
हीच दुनियादारी
Sanjay R.
Subscribe to:
Posts (Atom)