Thursday, September 8, 2022

प्रेम परीक्षा

मार्ग हा प्रेमाचा
नाही साधा सरळ ।
दिले तेवढे मिळेल
नाहीतर मनाचा छळ ।

वाटेवर काटे अती
दयावी लागे परीक्षा ।
तुटतो बंध जेव्हा
वाटे हीच ती शिक्षा ।
Sanjay R.


स्वप्नांना पंख

होतील पूर्ण सारे
स्वप्नांना हवेत पंख ।
पोचता शिखरावर
वाजतो मग शंख ।
प्रयत्न हवेत थोडे
कोण राजा कोण रंक ।
नशीब ही फिरेल मग
यशाला अपयशाचा डंख ।
Sanjay R.


दुनियादारी

थोडी हुशारी
थोडी कलाकारी
विना मारा मारी
जिंकली बारी
ज्यास देव तारी
त्यास कोण मारी
घडते वारी नी
पडते मग भारी
हीच दुनियादारी
Sanjay R.



Tuesday, September 6, 2022

आला ऊन वारा

आला ऊन वारा
कधी पाऊस धारा ।
गरजते आभाळ
वीज करते इशारा ।
थुई थुई नाचे मोर
फुलउन पिसारा ।
डोलते कसे झाड
अनोखा तो नजारा ।
भिजून दिसे कशी
चिंब चिंब ही धरा ।
सरते सूर्याची लाली
काळोख देतो पहारा
सारे सोडून मग येतो
चंद्रा सोबतीला तारा ।
Sanjay R.


कलाकारी

कलेची होते कलाकारी
काही तर अतीच भारी ।
सर्वस्व लावून पणाला
रंगवतात सुरेख चित्रकारी ।
जिंकतो मन प्रेक्षकांचे
वाजते त्यांची तुतारी ।
काही वस्ताद मोठे भारी
करतात मोठी कलाकारी ।
खिशाला पडतो गंडा
असतात महा अविष्कारी ।
Sanjay R.