Tuesday, September 6, 2022

आला ऊन वारा

आला ऊन वारा
कधी पाऊस धारा ।
गरजते आभाळ
वीज करते इशारा ।
थुई थुई नाचे मोर
फुलउन पिसारा ।
डोलते कसे झाड
अनोखा तो नजारा ।
भिजून दिसे कशी
चिंब चिंब ही धरा ।
सरते सूर्याची लाली
काळोख देतो पहारा
सारे सोडून मग येतो
चंद्रा सोबतीला तारा ।
Sanjay R.


कलाकारी

कलेची होते कलाकारी
काही तर अतीच भारी ।
सर्वस्व लावून पणाला
रंगवतात सुरेख चित्रकारी ।
जिंकतो मन प्रेक्षकांचे
वाजते त्यांची तुतारी ।
काही वस्ताद मोठे भारी
करतात मोठी कलाकारी ।
खिशाला पडतो गंडा
असतात महा अविष्कारी ।
Sanjay R.


सोनूली

आली घरात तानुली
सुंदर किती सोनूली ।
घर भरले आनंदाने
गुणाची किती बाहुली ।
Sanjay R.


याद


तुझे याद मै करू
और तू ना आये ।
धुंडता हु अब मै
बिखरी हुयी साये ।
Sanjay R.


हरपले भान

सावरू कसे या मनाला
हरपले भान या क्षणाला ।
काळजात प्रहार प्रेमाचा
पाहते वाट का कशाला ।
Sanjay R.