झुळझुळ वाहतो वारा
झाडासंगे हाले पसारा
सरसरून आल्या धारा
जो तो मग शोधी निवारा
मिळतो कुठे कसा सहारा
वादळाचाच होता इशारा
तुटून पडला सक्त पहारा
तोडून मोडून गेल्या धारा
खट्याळ किती होता वारा
गेला घेऊन तुटका निवारा
Sanjay R.
झुळझुळ वाहतो वारा
झाडासंगे हाले पसारा
सरसरून आल्या धारा
जो तो मग शोधी निवारा
मिळतो कुठे कसा सहारा
वादळाचाच होता इशारा
तुटून पडला सक्त पहारा
तोडून मोडून गेल्या धारा
खट्याळ किती होता वारा
गेला घेऊन तुटका निवारा
Sanjay R.
मन करते धावा
कुठे त्यास विसावा ।
रंग चढला प्रेमाचा
वाजतो हृदयात पावा ।
मन झाले बेभान
सूर टिपती कान ।
बघ वळून जरा
फिरव थोडी मान ।
नजरेस लागली नजर
थेंब पावसाचे सर सर ।
भिजले मन तयात
पडला साराच विसर ।
फुल सुगन्ध झाले
केसात थोडे विसावले ।
नाही कशाचे भान
श्वासही मंद झाले ।
रात्र बहरून आली
चांदणी झाली ओली
चन्द्र ढगाआड गेला
पहाट परतून आली ।
Sanjay R.
सावरू कसे मी मला
मन उधाण वाऱ्याचे ।
लागले वरीस सोळावे
आकर्षण त्या ताऱ्याचे ।
करतो चमचम तारा
छेडतो अंगास वारा
उडती केस भुरभुर
कळला मज इशारा ।
मोगरा फुलला अंगणात
केली सुगंधाची बरसात
गालात हसतो गुलाब
माळला हळूच केसात ।
SAnjay R.
तुझं ते रुसणं
गालात हसणं ।
आवडतं मला
सोबत असणं ।
नकोच वाटतं
तुझं ते नसणं ।
हवं मज वाटे
डोळयात बघणं ।
विचारात तुझ्या
माझं हरवणं ।
आठवण येता
तुलाच शोधणं ।
बघून मग तुला
मलाच विसरणं ।
Sanjay R.