Saturday, September 3, 2022

मन उधाण वाऱ्याचे

सावरू कसे मी मला
मन उधाण वाऱ्याचे ।
लागले वरीस सोळावे
आकर्षण त्या ताऱ्याचे ।

करतो चमचम तारा
छेडतो अंगास वारा
उडती केस भुरभुर
कळला मज इशारा ।

मोगरा फुलला अंगणात
केली सुगंधाची बरसात
गालात हसतो गुलाब
माळला हळूच केसात ।
SAnjay R.


माझं हरवणं

तुझं ते रुसणं
गालात हसणं ।
आवडतं मला
सोबत असणं ।
नकोच वाटतं
तुझं ते नसणं ।
हवं मज वाटे
डोळयात बघणं ।
विचारात तुझ्या
माझं हरवणं ।
आठवण येता
तुलाच शोधणं ।
बघून मग तुला
मलाच विसरणं ।
Sanjay R.


Friday, September 2, 2022

रुसवा

एकदा तिनं वळून
माझ्या कडे बघावं नी
गालात थोडं हसावं ।
क्षणातच मग फिरून
खोटंच का असेना
माझ्यावरती रुसावं ।
Sanjay R.

बापू झाले मंत्री

एकदा आमचे बापू
झाले मंत्री मोठे ।
सुचेना मग त्यांना
करू काय कुठे ।
दोन वेळा बसत नि
चार वेळा ते उठे ।
म्हणे विरोधी सारेच
आहेत मोठे झुटे ।
खाऊन टाकलं सारं
होते सारेच लुटे ।
बघा बघा कसे
बोलत आहेत खोटे ।
फसवले जनतेला
मारावे लागतात सोटे ।
आम्ही बघा कसे
इमानदार मोठे ।
जनता आहे जनार्दन
घालू त्यांना फेटे ।
कामासाठी आपल्या
घेतील आता खेटे ।
Sanjay R.


मी मंत्री

नको नको म्हणता
झालोच मी मंत्री ।
दिली ऑर्डर सोडून
घेऊन या हो संत्री ।
लागली सारी कामाला
होती नव्हती जंत्री ।
कळेना कुणास काही
म्हणे नको खाऊ मंत्री ।
Sanjay R.