वाटते किती शांत
पण असते तितकीच अशांत
अंधारी ती रात्र
नसते कधीच निवांत ।
भयानक रूप तिचे
चालतो कुठे आकांत ।
वाटतो खेळ भुतांचा
रूप त्यांचे विक्रांत ।
मनात भीतीचे काहूर
फक्त आभास तो शांत ।
Sanjay R.
Thursday, September 1, 2022
भयानक रूप तिचे
Wednesday, August 31, 2022
अश्रू डोळ्यात
आठवण येता तुझी मला
शब्द सहजच सुचतात ।
हृदयातल्या वेदना साऱ्या
लेखणीतून मग अवतरतात ।
दुःखाला फुटते वाचा नी
अश्रू होऊन ते बरसतात ।
थांबेना आसवांच्या धारा
सरसावतो हुंदका ओठात ।
Sanjay R.
श्रीमंत गरीब
गरिबांचा कुठला मान
सदैव सोसतो अपमान
श्रीमंतांना बघा थोडे
जिथे तिथे त्यांचीच शान
पैश्या कडे त्यांचे ध्यान ।
विनाकारणचे देतात सल्ले
न मागता सांगतात ज्ञान ।
बेतते जेव्हा संकट स्वतःवर
विसरतात मग सारे भान ।
प्रतिक्रिया असते भारी
वाटते तेव्हा बरे लहान ।
Sanjay R.
कशास बदला
सन्मान करील तो आपला
अपमानाचा कशास बदला ।
पाप पुण्य जे ज्याचे त्याचे
फळ भेटते त्याचे तदला ।
गोड बोलुनी जिंका सारे
शब्दातूनच मिळतील तारे ।
कोण आपले कोण परके
कठीण प्रसंगी कळते सारे ।
संयम हवा थोडा वाचेवरती
समुद्रालाही तर येते भरती ।
क्षणिक असतो राग सारा
शहण्यास हो पुरे इशारा ।
Sanjay R.
Tuesday, August 30, 2022
त्राही त्राही
शब्दांना तर असतो अर्थ
सांगून जातात बरंच काही ।
कानावर घेऊन सोडून देता
शब्दांना काहीच अर्थ नाही ।
हृदयाला जे स्पर्श करतात
अंतरात मग फुटते लाही ।
कधी मस्तकाचा घेताच वेध
जिकडे तिकडे त्राही त्राही ।
Sanjay R.
Subscribe to:
Comments (Atom)