Tuesday, August 30, 2022

मान सन्मान

कुठे कुणाचा मान
होतो कुठे सन्मान ।

मोठेपणाचा आव
मारतोय फक्त शान ।

विचार सारे सरले
सारेच विसरलो भान ।

पुस्तकांचे चाले पठण
नाही संस्कारांचे ज्ञान ।

असा कसा टिकेल हो
सांगा तुमचा स्वाभिमान ।

मोठेपणा विसरा थोडा
होऊन जरासे लहान ।

मिळेल ते हवे सारेच
झळकेल उंच निशान ।
Sanjay R.


भोगतो मी मरण

पोटासाठी काय चाले
कशाला हवे हो कारण ।
दिवस रात्र उपसतो कष्ट
भुकेचे केव्हाच झाले हरण ।
रक्ताचे आता झाले पाणी
बघा गोळा करतो सरण ।
मान अपमान केव्हाच गेला
डोळ्यात बघा फुटले धरण ।
काठीचाही आधार नाही
थरथर कापतात हे चरण ।
चल यमा आता घेऊन चल
रोजच तर भोगतो मरण ।
Sanjay R.

Wednesday, August 24, 2022

शुभेच्छा

देतो आज मी तुज शुभेच्छा
होऊ दे पूर्ण साऱ्या आकांक्षा ।
असतील नसतील त्या इच्छा
नसेल कधी कशाची प्रतीक्षा ।
शत शत आयुष्य तुज लाभू दे
नांदो सदा आनंद ही सदिच्छा ।
Sanjay R.


डिटेक्टिव्ह

प्रकरण होते गंभीर
सगळेच त्यात ऍक्टिव्ह ।
जो तो दाखवतो कसब
म्हणतो मी डिटेक्टिव्ह ।
Sanjay R.


विरोध विकृतीचा

साहित्याची तर लागेल वाट
विकृतांनी हो रचला घाट ।
बरा नाही हा असला थाट
वाचक हो तुम्ही दाखवा पाठ ।
तोडा आता ही अश्लील गाठ
नका होऊ तुम्ही ही माठ  ।
विरोधात व्हा एकदम ताठ
शिकवा आता तुम्हीच पाठ ।
Sanjay R.