Saturday, August 13, 2022

वाजतात बारा

होते किती चिडचिड
आली नाही ती तर ।
डोंगर कष्टाचा समोर
आठवते माहेर सासर ।

चंदा आसो वा मंदा
आवरते पसारा सारा ।
नाही आली तर मात्र
म्याडमचा भडकतो पारा ।

घरात सारे असतात चूप
कळतो साऱ्यांना इशारा ।
कामवाली नसली तर
घरात वाजतात बारा ।
Sanjay R.


जाग माणसा जाग

संघर्षाची वात पेटली
विझेल कशी ही आग ।
नको विसरू माणुसकी
जाग माणसा तू जाग ।

रक्ताची रे चटक तुझी ही
किती तुझा हा राग ।
डोळ्यातले ते अश्रू बघ
जरा माणसासारखा वाग ।

नाती गोती का विसरला
झालास विषारी नाग ।
भोगशील सारे तुही कधीरे
जाग जरासा जाग ।
Sanjay R.


जुने ते सोने

जुने जाऊन नेहमी
मिरवत नवे येते ।
टिकत नाही नवे
परत जुनेच येते ।

म्हणतात ना
नव्याचे नऊ दिवस ।
आणि जुन्यालाच
घालायचा नवस ।

जुने ते सोने
कोणी काही म्हणे ।
यायचेच आहे तिला
ती परत येतेय ।
Sanjay R.


ये रे ये तू परत

थकले रे डोळे आता
ये ना रे तू परत ।
त्राण न उरले आता
दिवस आले भरत ।

पैसा पैसा करशील किती
आई बाबा आहेत झुरत ।
तुझ्याविना जगतील कसे
म्हातारपणही आलं सरत ।

तुझ्याविना कुणाचा आधार
तुला करे नाही कळत ।
नजर तुझ्याच रे वाटेवर
श्वासही नाही ढळत ।

नाळ इतकी घट्ट किती
अशीच नाही रे तुटत ।
ये रे ये तू परत आता
प्राणही आता नाही सुटत ।
Sanjay R.


Friday, August 12, 2022

श्रद्धा

नको पैज नको कुठली स्पर्धा
काळजीने हो जीव होतो अर्धा ।
मेहनतीचेच तर हवे मज सारे
आहे माझी देवा तुझ्यावर श्रद्धा ।
Sanjay R.