Saturday, August 13, 2022

ये रे ये तू परत

थकले रे डोळे आता
ये ना रे तू परत ।
त्राण न उरले आता
दिवस आले भरत ।

पैसा पैसा करशील किती
आई बाबा आहेत झुरत ।
तुझ्याविना जगतील कसे
म्हातारपणही आलं सरत ।

तुझ्याविना कुणाचा आधार
तुला करे नाही कळत ।
नजर तुझ्याच रे वाटेवर
श्वासही नाही ढळत ।

नाळ इतकी घट्ट किती
अशीच नाही रे तुटत ।
ये रे ये तू परत आता
प्राणही आता नाही सुटत ।
Sanjay R.


Friday, August 12, 2022

श्रद्धा

नको पैज नको कुठली स्पर्धा
काळजीने हो जीव होतो अर्धा ।
मेहनतीचेच तर हवे मज सारे
आहे माझी देवा तुझ्यावर श्रद्धा ।
Sanjay R.

रक्षा बंधन

एक धागा प्रेमाचा
माया ममता नात्याचा
वचन त्यात आहे रक्षेचे
बंधन आहे रक्षाबंधनचे
Sanjay R.


बहिणीची माया

मिळते भावाला
बहिणीची माया ।
असते बहिणीला
भावाची छाया ।
Sanjay R.


मी हरणार आहे

नको लाऊस पैज तू
मीच तर हरणार आहे ।
जिंकलास तू जरी
एक दिवस जीवन सरणार आहे ।

जिंकलेस तू जग सारे
आयुष्य कुठे थांबणार आहे ।
जसा मिळाला जन्म तसा
अटळ तो मृत्यू येणार आहे ।
Sanjay R.