Friday, August 12, 2022

रक्षा बंधन

एक धागा प्रेमाचा
माया ममता नात्याचा
वचन त्यात आहे रक्षेचे
बंधन आहे रक्षाबंधनचे
Sanjay R.


बहिणीची माया

मिळते भावाला
बहिणीची माया ।
असते बहिणीला
भावाची छाया ।
Sanjay R.


मी हरणार आहे

नको लाऊस पैज तू
मीच तर हरणार आहे ।
जिंकलास तू जरी
एक दिवस जीवन सरणार आहे ।

जिंकलेस तू जग सारे
आयुष्य कुठे थांबणार आहे ।
जसा मिळाला जन्म तसा
अटळ तो मृत्यू येणार आहे ।
Sanjay R.


स्पर्धा

अविरत चाले हा प्रवास
आयुष्याचा वेळ त्यात अर्धा ।
थांबतो कोण कुणासाठी
इथे रोजच  तर असते स्पर्धा ।
Sanjay R.


इशारे

नको वाटते सारे
चुकवू किती पहारे ।
मन कुठे थांबते
देते सारखे इशारे ।
मोजता येईना कधी
आकाशातले तारे ।
स्पर्श करून जातात
अवखळ ते वारे ।
Sanjay R.